माझ्या रे प्रीती
फुला, ठेवू
मी कोठे तुला
मिरवू माथी
का फुला मी,
दगिना तू लाडका
दावू का ऐश्वर्य
माझे, उघड साऱ्या
निंदका
काळजाचा कंद
तू रे, रंग
डोळ्यातला
अधीर हळवे दोन
डोळे, पुष्पपात्रे
ही निळी
ठेविसी तेथे
फुला तू, फुलत
जाते पाकळी
भोवताली गंध
दाटे, धुंद
चैत्रातला
तूच नयनी तूच
हृदयी, तूच
वसशी जीवनी
काळ जाई कळत
नाही, दिवस
किंवा यामिनी
आणीला गे काय
संगे, गंध स्वर्गातला
|