आला वसंत ऋतू आला,
वसुंधरेला, हसवायाला,
सजवीत, नटवीत तारुण्याला
आला, आला, आला

शतरंगांची करित उधळण,
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला,
रसिकराज पातला

वृक्षलतांचे देह बहरले,
फुलाफुलांतुन अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या,
पंचमात कोकिळा

व्याकुळ विरही युवयुवतींना,
मधुरकाल हा प्रेम मीलना
मदनसखा हा शिकवी रसिका,
शृंगाराची कला
 
 
गीत - शांताराम आठवले
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सुभद्राहरण (१९६०)
For the printable version of this song, click here.