मुकेपणाने करिसी
सेवा, तूच एकला
मला विसावा
दुवा काय मी
तुजला द्यावा,
यशवंत हो, जयवंत
हो !
दुबळ्यापोटी
जन्मलास तू,
नकोस दुबळा
ठरू परंतु
पुरेच कर तू
माझे हेतू,
यशवंत हो, जयवंत
हो !
बाळपणी तुज
छळिते विपदा,
थोरपणी तू मिळव
संपदा
धनवंताना जिंक
दहादा, यशवंत
हो, जयवंत हो
!
व्यर्थ जन्म
रे विद्येवाचुन,
ज्ञान जगातील
घेई वेचुन
कीर्ति आण तू
पायी खेचुन,
यशवंत हो, जयवंत
हो !
तू अंधाच्या
हाती काठी,
तू कुलदीपक
आईपोटी
तूच एक मज पुढती
पाठी, यशवंत
हो, जयवंत हो
!
|