फुला, फुला
रे फुला, फुला
मी लपले, तू
शोध मला
गंध कुठे तो
शोध फुला
दिसत नसे पण
सुटला दरवळ
दलात भरल्या
लहरी अवखळ
डुले डहाळी
जसा झुला
तुझ्या मानसी
चाले रुणझुण
तीच सुगंधी
माझी गुणगुण
तुझीच प्रीती
भुलवी तुला
लपसि कुठे तू
वाऱ्यापाठी
तुझ्याच हृदयी
तुझ्याच ओठी
तुझ्या फुलविते
दला, दला
|