केव्हा तरी
पहाटे उलटून
रात्र गेली
मिटले चुकून
डोळे हरवून
रात्र गेली
कळले मला न
केव्हा सुटली
मिठी जराशी
कळले मला न
केव्हा निसटून
रात्र गेली
सांगू तरी कसे
मी वय कोवळे
उन्हाचे ?
उसवून श्वास
माझा फसवून
रात्र गेली
!
उरले उरात काही
आवाज चांदण्यांचे
.....
आकाश तारकांचे,
उचलून रात्र
गेली !
स्मरल्या मला
न तेव्हा माझ्याच
गीतपंक्ती
मग ओळ शेवटची
सुचवून रात्र
गेली !
आता कुशीत नाही
ती चंद्रकोर
माझी .....
( हलकेच कूस
माझी बदलून
रात्र गेली
)
अजुनी सुगंध
येई दुलईस मोग-याचा
.....
गजरा कसा फुलांचा
विसरुन रात्र
गेली ?
|