निघाले असतिल राजकुमार
पथ मिथिलेचा असतिल चुंबित कमळदळे हळुवार

कुठे पहाटे तृणांकुरांवर धुके पसरले असेल सुंदर
हिम रंगावर निळी पाऊले इमटवीत सुकुमार

कुठे तरुतळी सायंकाळी विसावेल ती मूर्त सावळी
तरुशाखांनी असेल केला तारासम झंकार

अंग थरथरे लवती लोचन समीप असतिल श्री रघुनंदन
आज स्मराने हळू उघडले आर्त मानचे द्वार
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत देसाई
स्वर - आशा भोसले
चित्रपट - स्वयंवर झाले सीतेचे (१९६४)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.