बाळा जो जो
रे, बाळा जो
जो रे
पापणिच्या पंखांत
झोपु दे डोळ्यांची
पाखरे !
झोपी गेल्या
चिमण्या राघू
चिमण्या राजा,
नकोस जागू
हिरव्या पानांवरी
झोपली वेलींची
लेकरे !
पुरे खेळणे
आता बाळा
थांबव चाळा,
थांबव वाळा
शब्द ऐकते झोपेमधुनी,
चावळते वारे
!
मेघ पांढरे
उशास घेउनि
चंद्र-तारका
निजल्या गगनी
वनदेवींनी उघडी
केली स्वप्नांची
मंदिरे !
|