सीमा झाली सोसण्याची, परी दुःख संपले नाही
करिते जीवनाची भैरवी !

हे काय जीणे नित दुःख पिणे रडता रडता सुख भासविणे
नाति फिरली, प्रीती फिरली, माझे कुणी उरले नाही !

मज तार अता, वा मार अता, मन बावरले तनु सावरता
ही काय दशा, हे परमेशा, ये धावुनिया लवलाही !
 
 
गीत - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - आशा भोसले
चित्रपट - झाले गेले विसरून जा (१९५७)
For the printable version of this song, click here.