अहो ऐका चतुरा
अध्यात्माची
कहाणी
किसनाने भुलविल्या
यमुनेवर गौळणई
ऐन दुपारी गौळण
नारी आल्या
यमुनेवरी
खुशाल सोडून
दिल्या जळावर
नक्षीच्या घागरी
वसने सुटली
अलगद पडली ओल्या
काठावरी
ठुमकत गोपी
जळात शिरल्या
उठली का शिरशिरी
गोपी न्हाण्यात
होत्या दंग
तोच आला सखा
श्रीरंग
गोळा करुन वस्त्रे
सारी
बसला चढून कळंबावरी
नको न्याहाळू
नितळ काया ओलेती
उघडी
दे रे कान्हा,
चोळी अन् लुगडी
बालपणीची अल्लड
नाती
मला कवळिले
तू एकांती
अजून का तुज
त्या खेळाच्या,
छंदाची आवडी
?
ऐन वयाची किमया
सारी
लाजवंति मी
भोळि भाबडी
कशि येऊ मी
काठावरती, मदनाची
लालडी ?
तूच दिली ही
यौवनकांती
कशी लोचने आतुर
होती
देहहुन ही मुक्त
भावना, शरणागत
बापुडी !
हात जोडिता
बंधन तुटले
अता जिवाला
मीपण कुठले
?
आत्म्याने जणु
परमात्म्याला,
अर्पण केली
कुडी !
|