आधी बीज एकलें बीज अंकुरलें रोप वाढलें
एका बीजापोटीं, तरु कोटी कोटी
जन्म घेती, सुमनें फळें
व्यापुनि जगता तूंहि अनंता
बहुविध रूपें घेसी, घेसी
परि अंती, ब्रम्ह एकलें
गीत
-
शांताराम आठवले
संगीत
-
केशवराव भोळे
स्वर
-
विष्णुपंत पागनीस
चित्रपट
-
संत तुकाराम (१९३६)