दत्तदिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

अनसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवहि झाली बाळे
त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे

तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरि, पायि खडावा,
भस्मविलेपीत कांती साजे

पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे
 
 
गीत - सुधांशु
संगीत - आर्‌. एन्‌. पराडकर
स्वर - आर्‌. एन्‌. पराडकर
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.