क्षण आला भाग्याचा ।
हासत मोदे नाचत नादे ।
हे मन माझे ।
मंगल दिन हा ।
आला सौख्याचा ॥
प्रेममया जीवनी या ।
जरी राहिले रंगुनिया ।
आला उदयाला बहराला ।
मंगल दिन हा ।
आला सौख्याचा ॥
गीत
-
मो. ग. रांगणेकर
संगीत
-
मा. कृष्णराव
स्वर
-
ज्योत्सना भोळे
नाटक
-
कुलवधु (१९४२)
राग
-
मिश्र यमनकल्याण
(नादवेध)