पाऊले चालती
पंढरीची वाट
सुखी संसाराची
सोडुनिया गाठ
गांजुनिया भारी
दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे
भाकरीचे ताट
आप्तइष्ट सारे
सगेसोयरे ते
पाहुनिया सारे
फिरविती पाठ
घेता प्रसाद
श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा
व्हावा नायनाट
मन शांत होता
पुन्हा लागे
ओढ
तैसा आणि गोड
संसाराचा थाट
|