उठा उठा हो सकळिक , वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धि-सिद्धिंचा नायक , सुखदायक भक्तांसी

अंगी शेंदुराची उटी, माथां शोभतसे कीरिटी
केशर कस्तूरी लल्लाटीं, हार कंठी साजिरा

कानीं कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा
माजी नागबंदी शोभा, स्मरतां उभा जवळी तो

कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकांची वाटी
रामानंद स्मरतां कंठी, तो संकटी पावतो
 
 
रचना - रामानंद
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
राग - भूप, देसकार (नादवेध)
For the printable version of this song, click here.