तुझा नि माझा एकपणा
कसा कळावा शब्दांना

दोन आपुल्या भिन्न आकृती
अंतरात पण एकच प्रीती
काव्य कळे ते नयनांना

जसा फुलांतुन गंध दरवळे
तसा मनातून स्नेह झुळझुळे
मिळे चेतना कणा कणा

चंद्र उगवता कमळे फुलती
प्रित उमलता हृदये जुळती
ज्यांच्या त्यांना कळती खुणा
 
 
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर - माणिक वर्मा
For the printable version of this song, click here.