माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते
संसार मांडते मी, संसार मांडते !

दारी घरी सुखाची रूपे उभी नटून
मी पाहते तयांना ही लोचने मिटून
माझ्याच सावलीला मी जवळ ओढते !

नाथा तुझी करावी सेवा अनन्य भावे
हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे
लडिवाळ राजसाची मी दृष्ट काढते !

हातात आज माझ्या सौभाग्यवाण आले
ठेवू कशी कुठे ग मी बावरून गेले
माझ्या खुळ्या सुखाला मी आज भेटते !
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - आशा भोसले
चित्रपट - बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७)
For the printable version of this song, click here.