अशी निशा पुन्हा कधी दिसेल का ?
अशी धरा असे गगन सजेल का ?
सुरम्य चंद्रबिंब तारकावली
निशा चढे निशेस चोर पावली
ढगात चंद्र मग जरा लपेल का ?
सुगंध रातराणीचा तरंगतो
प्रशांत धुंद आसमंत पेंगतो
दवात मग धरा जरा भिजेल का ?
विशाल तो कदंब झेली चांदणे
मिठीत भान हरपुनी सुखावणे
अशीच उर्मी अन् कधी मिळेल का ?
गीत
-
यशवंत देव
संगीत
-
यशवंत देव
स्वर
-
लता मंगेशकर
,
पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट
-
कामापुरता मामा (१९६५)