कुणीही पाय
नका वाजवू,
पाय नका वाजवू
चाहूल देउन
नका कुणी ग
चिमण्याला जागवू
नकोस चंद्रा
येऊ पुढती,
थांब जरासा
क्षितीजावरती
चमचमणारे ते
चंदेरी चाळ
नको नादवू
पुष्करणीतून
गडे हळूहळू,
जललहरी तू नको
झुळझुळू
नकोस वा-या
फुलवेलींना,
फुंकरीने डोलवू
नकोस मैने तोल
सावरू, नकोस
कपिले अशी हंबरू
यक्ष-प-यांनो
स्वप्नी नाचून
नीज नका चाळवू
जगावेगळा छंद
ग याचा, पाळण्यांतही
खेळायाचा
राजी नसता अखेर
थकुनी पंख मिटे
पाखरू
|