वय तर माझे
सोळा सत्रा
स्वभाव अगदी
भोळा भित्रा
आधार जीवाला
वाटवा
असा कुणी मज
भेटावा
जो येतो तो
भवती फिरतो
सौंदर्याचे
कौतुक करतो
हा त्रास जयाने
निपटावा
असा कुणी मज
भेटावा
कुणी म्हणे
मज गुलाब हसरा
कुणी म्हणे
मज गुणी शर्करा
अभिमान जयापुढे
फिकटावा
असा कुणी मज
भेटावा
ब्रम्हचारी
मज देतो टॉफी
गृहस्थ पाजितो
काळी कॉफी
पण संसार जयासी
थाटवा
असा कुणी मज
भेटावा
एकोणिस वा वीस
वयाचा
मलाच राहील
वचक जयाचा
मन पतंग त्याने
काटावा
असा कुणी मज
भेटावा |