शोधिसी मानवा,
राऊळी मंदिरी
नांदतो देव
हा, आपुल्या
अंतरी
मेघ हे दाटती,
कोठुनी अम्बरी
?
सूर येती कसे,
वाजते बासरी
?
रोमरोमी फुले,
तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी,
दूर ती पंढरी
गंध का हासतो,
पाकळी सारुनी
?
वाहते निर्झरी,
प्रेमसंजीवनी
भोवताली तुला,
साद घाली कुणी
खूण घे जाणुनी,
रूप हे ईश्वरी
भेटतो देव का,
पूजनी अर्चनी
?
पुण्य का लाभते,
दानधर्मातुनी
?
शोध रे दिव्यता,
आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा
खेळशी कुठवरी
?
|