उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या
फुलती तुझ्या स्मृतींच्या, कलिका मनातल्या

येऊ कशी निघोनी, पाऊल अडखळे
विरहात वेचिताना, घटना सुखातल्या

उठता तरंग देही, हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजूनी, भेटी वनातल्या

हासूनिया खुणावी, ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या, तारा नभांतल्या
 
 
गीत - उमाकांत काणेकर
संगीत - श्रीकांत ठाकरे
स्वर - शोभा गुर्टू
राग - मिश्र भैरवी
For the printable version of this song, click here.