आज तुजसाठी,
या पाउलांना,
रे पंख फुटले
झनक झन झन,
मदिर सरगम,
अधिर मन झाले
प्रीती अनोखी
आली बहारा
देही नशेचा
नाचे पिसारा
धुंदीत जग हे
आता नहाले
प्रीती अनोखी
आली बहारा
सागम धनीध धनीध
नीसानी
सागम गसानी
सानी धनीमधगम
नीनीनी धधध
ममम गगग
सानी सानी धनीसा
गमग मग
झनक झन झन,
मदिर सरगम,
अधिर मन झाले
आतूर धरणी भेटे
नभाला
आता किनारा
नाही सुखाला
नाते युगांचे
फुलले निराळे
आतूर धरणी भेटे
नभाला
सागम धनीध धनीध
नीसानी
सागम गसानी
सानी धनीमधगम
नीनीनी धधध
ममम गगग
सानी सानी धनीसा
गमग मग
झनक झन झन,
मदिर सरगम,
अधिर मन झाले
|