दूर दूर चांदण्यात
मी असाच हिंडतो
!
तारकांस हालचाल
मी तुझी विचारतो
!
वाटते कधी चुकून
भेटशील तू अजून
थांबतो पुन्हा
मधून
अन् उगीच सावल्यात
सैरभर पाहतो
!
चाललो असेच
गात
ऐकते उदास रात
चंद्रमा झुरे
नभात
अन् इथे फुलाफुलात
मी तुलाच शोधतो
!
वेड लागले जिवास
हे तुझे दिशात
भास
हा तुझा मनी
सुवास
आपल्याच आसवांत
मी वसंत ढाळतो
!
|