आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभ-या गर्दीत मांडुन इवले घर

या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा थर
या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार

आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर
 
 
गीत - ना. धों. महानोर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - रवींद्र साठे, चंद्रकांत काळे
चित्रपट - जैत रे जैत (१९७७)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.