अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला
मयुरा रे, फुलवीत ये रे पिसारा

जलधारेच्या वर्षावाने, हिरव्या कोमल अनुरागाने
वसुंधरेच्या श्वासाने हा गंधीत होई वारा

पानांचे मधुगीत गाउनी, थेंबांचे पदि नुपूर बांधुनी
रिमझिमणाऱ्या तालावरती नर्तन करी लयकारा
 
 
गीत - विणा चिटको
संगीत - विणा चिटको
स्वर - रामदास कामत
For the printable version of this song, click here.