कुणीतरी सांगा श्रीहरीला
एकदा भेट राधिकेला

विसरलास का देवा गोकुळ
बालपणीचे वय ते अवखळ
विसरलास का यमुनातटीच्या
मुग्ध प्रेमलीला

मुर्ति तुझी ही रोज पूजिते
कसे कळावे प्रिया तुला ते
आठविता तुज, विसर निजेचा
पडला नयनाला

राज्य करिसी तू मथुरेवरती
दुरुन ऐकते मी तव कीर्ति
तुझ्या दर्शना नंदनंदना
जीव हा आसुसला
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - राम कदम
स्वर - आशा भोसले
चित्रपट - प्रेम आंधळं असतं (१९६०)
राग - जोगकंस (संगीत यात्रा)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.