ऐकशील माझे का रे अर्थहीन गीत
दूर दूर जाते धरुनि उरी तुझी प्रीत

वाट तुझी बघता का रे पाय थकुन गेले
निमंत्रणावाचुनि जवळी मरण मात्र आले
फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत

भाग्य हेच अजुनि येतो गंध पाकळीस
स्पर्ष तुझा झाला होता चुकुन या कळीस
उमलताच सुकली ही, आयु हे पुनित

सूर आर्त गीताचा या तुझ्या कधी यावा
अश्रुबिंदु एकच नयनी तुझ्या ओघळावा
हेतु एक शेवटचा या थरथरे मनात
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - लाखाची गोष्ट (१९५२)
For the printable version of this song, click here.