ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला

पूर्व दिशी उमटे भानु, घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला

कुक्षी घेऊनिया कुंभा, उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा गोविंदा गोपाला

पुंडलीक हाका देई उभ्या राही, रखुमाबाई
निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - प्रसाद सावकार
चित्रपट - संत गोरा कुंभार (१९६७)
राग - भूप, देसकार (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.