कल्पनेचा कुंचला, स्वप्नरंगी रंगला
चित्र मी काढू कसे, सजणा सांग ना !

हे निळेपण पांघरावे
गीत माझे मोहरावे
शब्द मी माळू कसे,
सजणा सांग ना, सांग ना !

खेळतो हा धुंद वारा
या धुक्याच्या शुभ्र धारा
रंग मी खेळू कसे,
सजणा सांग ना, सांग ना !

आज संध्या रूप घेई, प्रीतिचे
प्रीतिचे मज दान देई
गूज मी बोलू कसे,
सजणा सांग ना, सांग ना !
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - उषा मंगेशकर
चित्रपट - जोतिबाचा नवस
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.