काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी कधि रे येशिल राजा

पाऊस येडापिसा जिवाला लावून गेला तात
तुफान आलं सुसाट माजा करून गेला घात
कातरयेळी करनी जाली हरवून गेला राजा

सुकली फुलांची शेज राया राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळावाया श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी ये रे ये एकदा राजा

धनी जीवाचा तू मनाचा राया आधार तू
सपनात गाण्यात तूच माझ्या मनात प्राणात तू
चांदण्या राती माडाच्या साथी भेटल जीवाचा राजा
 
 
गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.