संतपदांची जोड दे रे हरि साधुपदाची जोड ॥
संतसमागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड ॥
सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥
अमृत म्हणे रे हरि । भक्ताचा शेवट करिसी गोड ॥
रचना
-
संत अमृतराय महाराज
संगीत
-
स्वर
-
पं. जितेंद्र अभिषेकी