दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया !
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या !

असह्य एकलेपणा, आस आसवी मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव, ये तमास पूर या !

दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी
दृष्टिभेटही नसे, काय सांगणे जनी
एकवार तूच ये सखीस धीर द्यावया !

सलत सूर सनईचा वारियात कापरा
सुकून पाकळी मिटे, मुग्ध भाव लाजरा
फुलात गंध कोंदला, वाट ना उरे तया !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर -
चित्रपट - अंमलदार (१९५३)
राग - पूरिया (नादवेध)
For the printable version of this song, click here.