चला जाउ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला

इथेच टाक तंबू, इथेच टाक तंबू
जाता जाता जरा विसावा, एक रात्र थांबू
इथेच टाक तंबू, इथेच टाक तंबू

थोडी हिरवळ, थोडे पाणी
मस्त त्यात ही रात चांदणी
उतरा ओझी, विसरा थकवा
सुखास पळभर चुंबू !

अंग शहारे जशी खंजिरी
चांदही हलला, हलल्या खजुरी
हलल्या तारा, हलला वारा
नृत्य लागले रंगू !

निवल्या वाळूवरी सावली
मदमस्तानी नाचु लागली
लयीत डुलती थकली शरीरे
नयन लागल झिंगू !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट - गुळाचा गणपति (१९५३)
For the printable version of this song, click here.