पहाट झाली उद्यानातुन मंदिरी ये गारवा,
जळते मी हा जळो दिवा

वचन देऊनी नाही आले
रातभरी रडून जागले
सुकली वेणी सुकला मरवा

युद्धावीण हो रणी पराजीत
रुद्ध मनोरथ निराश मन्मथ
आणा चंदन उरी सारवा

ज्योत फिकटली हो अरुणोदय
पुरूष प्रणय हा केवळ अभिनय
स्त्री हृदयाची त्यास न परवा

शृंगाराचा लाथाडुनी घट
गोकुळातला गेला खट-नट
स्मृती तरि ग माझी हरवा
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - माणिक वर्मा
पुणे आकाशवाणी संगितिका ’पारिजातक’
राग - तोडी (नादवेध)
For the printable version of this song, click here.