ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता, भगवंता
लक्ष द्या हो विनवीते मराठी मी त्याची माता

गोड माझ्या सोनुल्याचा, लळा लागे बालपणा !
बांधुनीया घुंगुरवाळे, अंगी नाचे थोरपणा !
निरूपण सांगायाला, तुम्ही द्या हो शहाणपणा
बाळमुखी मोठा घास, भरवा हो जगन्नाथा

निरक्षर लोकांसाठी, प्राणांचेही देऊन मोल
अमृताते जिंकून पैजा धावे मराठीचा बोल
ज्ञानदीप डोळियांचे तेजाळता तेजोगोल
देवगुरु खाली आले जोडोनिया दोन्ही हाता
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - आशा भोसले
राग - भूप, नट (नादवेध)
For the printable version of this song, click here.