पुनवेचा चंद्रम आला घरी
चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुऱ्यात
खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात
तुझा माझा एकांत रे साजणा !

लाटांचे गीत निळे
काठाला ते गूज कळे
सागरलाटा भिडती काठा
ओठावरती गीत जुळे
निळ्या निळ्या पाण्यात
एका खुळ्या गाण्यात
तुझा माझा एकांत रे साजणा !

चंदेरी धुंद हवा
साथीला तूच हवा
थरथरणारा एक इशारा
या रात्रीचा रंग नवा
लाजऱ्या या गालात
हृदयाच्या तालात
तुझा माझा एकांत रे साजणा !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - बाळ पार्टे
स्वर - कृष्णा कल्ले
चित्रपट - मंगळसूत्र (१९६८)
For the printable version of this song, click here.