अजब सोहळा !
अजब सोहळा !
माती भिडली
आभाळा !
मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी
तिचा केला चोळामोळा
!
किती काळ साहील
?
किती मूक राहील
?
वादळली माती
करी वाऱ्याचा
हिंदोळा !
कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे, आता
बघ उघडून डोळा
!
मातीची धरती
देह मातीचा
वरती
माती जागवू
दे मातीचा जिव्हाळा
!
|