जयोस्तुते श्रीमहन्मंगले
! शिवास्पदे
शुभदे
स्वतंत्रते
भगवती ! त्वामहं
यशोयुतां वंदे
राष्ट्राचे
चैतन्य मूर्त
तू नीती-संपदांची
स्वतंत्रते
भगवती ! श्रीमती
राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या
नभात तूची आकाशी
होसी
स्वतंत्रते
भगवती ! चांदणी
चमचम लखलखसी
वंदे त्वामहं
यशोयुतां वंदे
गालावरच्या
कुसुमी किंवा
कुसुमांच्या
गाली
स्वतंत्रते
भगवती ! तूच
जी विलसतसे
लाली
तू सूर्याचे
तेज, उदधीचे
गांभीर्यहि
तूची
स्वतंत्रते
भगवती ! अन्यथा
ग्रहण नष्ट
तेची
वंदे त्वामहं
यशोयुतां वंदे
मोक्ष-मुक्ति
ही तुझीच रूपे
तुलाच वेदांती
स्वतंत्रते
भगवती ! योगिजन
परब्रम्ह वदती
जे जे उत्तम
उदात्त उन्नत
महन्मधुर ते
ते
स्वतंत्रते
भगवती ! सर्व
तव सहचारी होते
वंदे त्वामहं
यशोयुतां वंदे
हे अधम-रक्तरंजिते,
सुजन पूजिते,
श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण
ते जनन, तुजवीण
जनन ते मरण
तुज सकल चराचर
शरण, चराचर
शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं
यशोयुतां वंदे
|