डोळ्यांवरून माझ्या उतरून रात्र गेली
वचने मला दिलेली विसरून रात्र गेली !

डोळ्यांत जन्म सारा, दाटून डोह झाला
अश्रूंत चंद्र माझ्या विखरून रात्र गेली !

मी मानिले मनाशी, माझेच सर्व तारे
स्वप्नात हाय माझ्या विसरून रात्र गेली !

आश्वासने किती ती, पाऊस तो फुलांचा
काळोख फक्त हाती ठेवून रात्र गेली !
 
 
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अरुण पौडवाल
स्वर - अनुराधा पौडवाल
For the printable version of this song, click here.
   
  Anuradha Paudwal
  Anuradha Paudwal
  Courtesy -
Prakash Bhonde,
Pune