नको आरती की
नको पुष्पमाला
प्रभू भोवताली
असे व्यापलेला
खगांच्या मुखाने
प्रभू गाइ गाणे
फुलांतून उधळी
सुगंधी उखाणे
गगनांत फुलवी,
नवरंग-लीला
सदासर्वकाळी
दुज्यांसाठि
झिजतो
पुण्यवान जगती
खरा तोच जगतो
त्यागात मनुजा,
उभा स्वर्ग
भरला
प्रकाशात फुलतो
अंधार काळा
उन्हापाठि पळतो
कसा पावसाळा
बुडे प्रेमरंगी,
कळे खेळ त्याला
|