राम चालले,
तो तर सत्पथ
थांब सुमंता,
थांबवि रे रथ
थांबा रामा,
थांब जानकी
चरणधूळ द्या
धरूं मस्तकीं
काय घडे हें
आज अकल्पित
!
रामराज्य या
पुरीं यायचें
स्वप्न लोचनीं
अजुन कालचें
अवचित झाले
भग्न मनोरथ
गगननील हे,
उषःप्रभा ही
श्रीरघुनंदन,
सीतामाई
चवदा वर्षें
का अस्तंगत
?
चवदा वर्षें
छत्र लोपतां
चवदा वर्षें
रात्रच आतां
उरेल नगरी का
ही मूर्च्छित
?
कुठें लपे ती
दुष्ट कैकयी
?
पहा म्हणावें
हीन दशा ही
अनर्थ नच हा,
तुझेंच चेष्टित
करि भरतातें
नृप मातोश्री
रामा मागें
निघे जयश्री
आज अयोध्या
प्रथम पराजित
पिताहि मूर्च्छित,
मूर्च्छित माता
सोडुन रामा,
कोठें जातां
?
सवें न्या तरी
नगर निराश्रित
ये अश्रूंचा
पट डोळ्यांवर
कोठें रथ तो
? कोठें रघुवर
गळ्यांत रुतली
वाणी कंपित
|