उगा कां काळिज
माझें उले ?
पाहुनी वेलीवरचीं
फुलें
कधी नव्हे तें
मळलें अंतर
कधीं न शिवला
सवतीमत्सर
आज कां लतिकावैभव
सले ?
काय मना हें
भलतें धाडस
?
तुला न आवडे
हरिणी-पाडस
पापणी वृथा
भिजे कां जलें
?
गोवत्सांतिल
पाहुन भावां
काय वाटतो तुजसी
हेवा ?
चिडे कां मौन
तरी आंतलें
?
कुणी पक्षिणी
पिलां भरविते
दृश्य तुला
तें व्याकुळ
करितें
काय हें विपरित
रे जाहलें ?
स्वतःस्वतःशीं
कशास चोरी ?
वात्सल्याविण
अपूर्ण नारी
कळालें सार्थक
जन्मांतले
मूर्त जन्मते
पाषाणांतुन
कौसल्या का
हीन शिळेहुन
?
विचारें मस्तक
या व्यापिलें
गगन अम्हांहुनि
वृद्ध नाहि
का ?
त्यांत जन्मती
किती तारका
!
अकारण जीवन
हें वाटलें
|