काय ऐकतें ?
काय पाहतें
? काय अवस्था
ही ?
रघुवरा, बोलत
कां नाहीं ?
जायेआधीं मरण
पतीचें, हें
कैसें घडलें
?
दैवच अंती तुटुन
खड्गसे माझ्यावर
पडलें
पुण्यहीन का
ठरल्या लोकीं
कौसल्यामाई
?
ज्योतिषांचीं
ग्रहगणितें
का सर्वथैव
चुकलीं ?
अभागिनी ही
कशी अचानक सर्वस्वा
मुकली ?
धुळींत निजले
पुरुषोत्तम
का या मूढेपायीं
?
ओळखितें मी
कमलनेत्र हे,
ओळखितें श्रवणें
सरे न का ही
झोंप राघवा,
दीनेच्या रुदनें
?
गतीहीन कां
झाली सृष्टी,
सुन्न दिशा
दाही ?
सुवर्णधनु हें
ओळखिलें पण
कुठें महाबाहु
?
श्यामवर्ण ती
मूर्त पुन्हां
मी कुठें कधीं
पाहूं ?
नयन जाहले रडुन
कोरडे, अंगाची
लाही
विवाहसमयीं
शपथ दिली ती
विसरलांत सखया
!
पुशिल्यावांचुन
स्वर्गी गेला
सोडुनिया जाया
ऐकलेंत का ?
- जनकनंदिनी
आर्त तुम्हां
बाही
रघुकुलतिलका,
तुम्ही भेंटला
पितरांना स्वर्गी
परक्या हातीं
सजीव उरली अर्धांगी
मार्गी
रघुकुलजातें
शोभुन दिसली
रीत तरी का
ही ?
अथांग सागर
जिंकुन आला
कशास मजसाठीं
?
काय जन्मलें
कुलनाशिनि मी
धरणींच्या पोटीं
?
जनकें केले
यज्ञ, तयांची
काय सांगता
ही ?
हे लंकेशा,
ज्या शस्त्रानें
मारविलें नाथां
घाव तयाचा घाल
सत्वरीं सीतेच्या
माथां
रामामागें तरी
जाउं दे अंतीं
वैदेही
|