सांज झाली तरी
माथ्यावरी उन्हाचे
भरते !
अशी एकाकी मी
.... माझी मला
.... माझी न
मी उरते !
घाई जगण्याची,
अशी दाटली गर्दी
भवती
आणि रसत्यात,
भर उन्हात तुझा
हात सुटला
थकले मी धावुनी,
सावलीचा पाठलाग
करते
सांज झाली तरी
माथ्यावरी उन्हाचे
भरते !
धागे तुटले
जरी स्वप्ने
तुझी विणता-विणता
ती वीण आजही
छातीतली निरगाठ
आहे
ही नजर आजही
तू नेलेल्या
दिवसात भिडते
सांज झाली तरी
माथ्यावरी उन्हाचे
भरते !
|