उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !

होऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ

झुलवतो दिवटी दिपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !

उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !

घरोघरी हिंडतो न्‌ गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न्‌ गोंधळ देवीचा मांडतो
भवानी बसली ओठी गळी
आम्ही अंबेचे गोंधळी !

सान थोर नेणतो न्‌ आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न्‌ आम्ही दैवाशी जाणतो
गावली मुळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी

बोला अंबाबाईचा .... उधो !
रेणुकादेवीचा .... उधो !
एकवीरा आईचा .... उधो !
या आदिमायेचा .... उधो !
जगदंबेचा .... उधो !
महालक्ष्मीचा .... उधो !
सप्तशृंगीचा .... उधो !
काळुबाईचा .... उधो !
तुळजाभवानी आईचा .... उधो !
 
 
गीत - ???
संगीत - अजय, अतुल
स्वर - अजय
चित्रपट - अगं बाई .... अरेच्चा ! (२००४)
For the printable version of this song, click here.