हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

नवे पंख पसरा
उंच उंच लहरा
भिरभिरणारे, गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

गुलाबी हवा अशी
मंद मंद वाहते
शराबी कळी अशी
चिंब चिंब नाहते
सुगंधी फुलांना नशा आज आली
सडा शिंपिला हा जणू प्रितीने

नव्या संगितातले
तराणे नवे असे
कुणी सोबती मला
मिळाया हवे असे
जन्म हे जगावे, विश्व हे बघावे
एकरूप व्हावे संगसाथीने
 
 
गीत - ???
संगीत - ???
स्वर - सोनू निगम
चित्रपट - नवरा माझा नवसाचा (???)
For the printable version of this song, click here.