फुलांनी रूसावे अशी कोमला तू
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू
तुझा मखमली स्पर्श वाऱ्यास होतो
वाहणे विसरतो तो धुंद होतो
कसा हा कळावा तुझा गोड कावा
कुणीही फसावे अशी मृगजळा तू
असे रूप लपवू नको फार आता
खुळा जाहला केशसंभार आता
मला गुंतुदे त्यात भ्रमरा परि गे
कितिदा पिऊ अक्षयी मध फुला तू
गीत
-
नितिन आखवे
संगीत
-
किशोर रानडे
स्वर
-
स्वप्नील बांदोडकर
चित्रपट
-
क्षण (२००७)