आज तुला जवळून पहायचे आहे
थोडे स्वप्नांसवे खेळायचे आहे
लाजरा चेहरा सांगतो अबोल प्रीती
हे तुझे लाजणे शब्दांनी टिपायाचे आहे
मी कशाला बाळगू भिती या जगाची
या जन्मी तुला माझेच व्हायचे आहे
तूच माझी प्रीत वर्षा झालीस गे
मुक्त बरसून आज चिंब भिजायचे आहे
गीत
-
नितिन आखवे
संगीत
-
किशोर रानडे
स्वर
-
शिवानी पारेकर, स्वप्नील बांदोडकर
चित्रपट
-
क्षण (२००७)