एक एक एक तो क्षण आला तुझ्यातला माझ्यातला
सजून गेला आसवांनी चिंब मज भिजवून गेला
झरूनी गेल्या क्षणसरींनी अजुन ओला मी सखे
का असे झाले मला ते सुख सखे ग पारखे
कोरडी झालीस तू तरी अजुन मी ओलावला
बेगडी दुनियेत माझ्या भावनांचा खून झाला
वेदनांचा माझिया गे ना कुणाला भार झाला
जाणवे तो सोनचाफा त्या तुझ्या श्वासातला
वेगळी व्याकुळता ही आगळी या दूरता
तोच मी तीच तू तरी का सुरांना आर्तता
जो दिला तू अर्थ त्यांना तोच मी स्वीकारला
गीत
-
नितिन आखवे
संगीत
-
किशोर रानडे
स्वर
-
स्वप्नील बांदोडकर
चित्रपट
-
क्षण (२००७)