धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वाऱ्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना
सये रमुनी या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे ?
धुंद होते शब्द सारे !

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !
 
 
गीत - कौस्तुभ सावरकर
संगीत - अमार्त्य राहूत
स्वर - रवींद्र बिजूर
चित्रपट - उत्तरायण (२००५)
For the printable version of this song, click here.